सतीश रावले यांच्यासाठी,

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार...

कविता छान लिहिली आहे. दुसरं म्हणजे, 'हि (ही) सन २००८ मध्ये लिहिलेली आहे' हे पाहून अजून आनंद झाला.

माझ्या कवितेबरोबरच तिच्या रचनाकालावरही तुम्ही लक्ष ठेवून असता, याचा मलाही खूप आनंद झाला...! :)
मी माझ्या कवितेखाली रचनाकाल लिहितो, म्हणून तो तुम्हाला (म्हणजे सगळ्या वाचकांना) कळतो. अन्यथा संबंधित कविता जुनी आहे की नवी आहे, हे वाचकाला कळण्याची सुतराम शक्यता नाही...नसते. मी रचनाकाल लिहिला नाही तर दहा वर्षांपूर्वीची कविताही तुम्हाला दहा तासांपूर्वीचीच वाटू शकेल... :)
आपण (म्हणजे आपण सगळेच) कोणतीही कविता, कथा, लेख (यादी कितीही लांबवता येईल... ) जेव्हा प्रथमच वाचत असतो, तेव्हा ती आपल्यासाठी नवीन - अगदी नवीन - असते... मग संबंधिताने तो साहित्यप्रकार कोणत्याही का साली लिहिलेला असेना !
जुने आणि नवे असा निकष लावायचा झाल्यास खूपच अवघड होईल... हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले रामायण, महाभारत, कुराण, बायबल हे धर्मग्रंथ मी आजही मनापासून, आवडीने वाचतो... दर वेळी हे ग्रंथ मला काहीतरी (हजारो वर्षांपूर्वीचे असूनही!!! ) वेगळे [वेगळे या शब्दाऐवजी नवे हा शब्द वापरू का इथे? :) ] असे देऊन जातात... [माझ्या फुटकळ कवितांची तुलना मी या अजरामर महाग्रंथांशी करत आहे, असा अर्थ कृपया मुळीचच घेऊ नये... केवळ जुने आणि नवे यातील फोलपणा (अर्थात ही माझी भूमिका आहे... तुमचे मत वेगळे असूही शकेल) दाखवून देण्यासाठीच मी जुन्यात जुन्या आणि यापैकी कोणता ना कोणता ग्रंथ, त्यातील कथा-उपकथा आपण सगळ्यांनीच कधी ना कधी वाचलेल्या आहेत / असतात... म्हणून या ग्रंथांची नावे उदाहरणादाखल घेतली आहेत. ]
मी येथे सादर केलेल्या आजवरच्या सगळ्याच कविता तुमच्यासाठी नवीनच आहेत, सतीशराव. [ (कारण तुम्ही त्या प्रथमच वाचलेल्या आहेत. तुमची-माझी यापूर्वी ओळखही नव्हती़; त्यामुळे या कविता मी तुम्हाला याआधी कधी दाखविल्या (आणि येथे वाचताना त्या तुम्हाला जुन्या वाटल्या) म्हणावे, तर तसेही नाही!!! ] ... मग माझी कोणती कविता ताजी आहे आणि कोणती कविता शिळी आहे, असा ऊत शब्दांना आणण्याचे काहीच कारण नाही... नसावे.   हो ना?  
.................
आता एक उदाहरण घेऊ या -  समजा क ही व्यक्ती आज (म्हणजे २००८ साली)  १८ वर्षांची आहे. या व्यक्तीला कवितांची खूपच आवड आहे... ख या ख्यातनाम (दिवंगत) कवीचा काव्यसंग्रह क याच्या हाती सध्या आहे.  हा काव्यसंग्रह १९७८ साली प्रकाशित झालेला आहे... (शिवाय या काव्यसंग्रहातील कविता ख या कवीला १९७० वगैरे साली सुचलेल्या आहेत, ही बाब पुन्हा वेगळीच. क याला ही गोष्ट माहीतही नाही. )... आता क याने असे म्हणायचे का, की `छे, छे, या कविता तर तीस वर्षांपूर्वीच्या (प्रकाशनकाल ः १९७८)  जुन्या आहेत... नकोत बाबा या कविता वाचायला...! यात नवेपणा असा काहीच नाही.`
 आता क या व्यक्तीकरिता तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी ख यांनी नव्या कविता लिहिण्यासाठी २००८ साली पुन्हा जिवंत व्हायचे की काय???   क याच्या लेखी ख यांच्या कविता नवीनच आहेत. मग त्या कविता ख यांना १९७० साली का सुचेनात आणि १९७८ साली का प्रकाशित होईनात...!!!
.................

साहित्यात (आणि अक्षय अशा कोणत्याही वस्तूसंदर्भात) नवे आणि जुने असे काहीही नसते... आपल्याला जी गोष्ट / व्यक्ती अगदी प्रथमच दिसते, आढळते, भेटते ; ती गोष्ट, ती व्यक्ती आपल्यासाठी नवीनच असते.
हां... आता १९९८ किंवा अशाच त्या वर्षाच्या पुढे-मागे मला सुचलेल्या कविता आजही - टवटवीत म्हणणार नाही मी़; पण किमान- वाचनीय आहेत की नाहीत, हे मी नाही सांगू शकणार... (तसे सांगणे म्हणजे `अहो रूपं अहो ध्वनि ` असा प्रकार व्हायचा! ) पण त्या येथे सादर केल्यानंतर प्रतिसाद (संख्यात्मक) बरे मिळालेले आहेत. मी अशा संबंधित कवितांखाली रचनाकालच लिहिला नसता तर कुणाला समजले असते की, ही कविता दहा वर्षांपूर्वीची आहे की दहा तासांपूर्वीची ?  
.....................
तुमच्या हार्दिक प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार.... लोभ आहेच; असाच राहू द्यावा...
.....................

आपला,
प्रदीप कुलकर्णी

(विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)