आपण जेव्हा एखाद्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये (उदा. VC) प्रोग्रॅम लिहून तो चालवतो तेव्हा खालील गोष्टी होतात.

१. प्रत्येक ऑपरेटींग सिस्टीम (उदा. Windows) मध्ये उपयोगकर्त्यांसाठी एक सूचनांचा संच असतो ज्याला ऍप्लिकेशन प्रोग्रॅमिंग ईंटरफेस(API) असे म्हणतात. Compiler आपण लिहिलेल्या प्रोग्रॅमचे API सूचनांमध्ये, म्हणजेच ऑपरेटींग सिस्टीमला समजणाऱ्या भाषेमधे रूपांतर करतो.

२. ऑपरेटींग सिस्टीम या रूपांतरीत सूचनांचे शून्य आणि एकच्या (बायनरी) म्हणजेच हार्डवेअरला समजणाऱ्या भाषेत रूपांतर करते. प्रोग्रॅम execute करताना या बायनरी सूचना हार्डवेअरला दिल्या जातात.

आपण वापरतो त्यापैकी बहुतेक प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे काम साधारणपणे वरील प्रकारे चालते. या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमधले if, for, while हे कीवर्डस आपल्याला समजावे म्हणून ईंग्रजीत लिहिलेले असतात. ते कोणत्याही भाषेमध्ये लिहिले जाऊ शकतील. फक्त पायरी क्र. १ मध्ये Compilerने त्याचे API सूचनांमध्ये बरोबर रूपांतर केले की काम झाले. उद्या if च्या 'जर', while च्या ऐवजी 'जोपर्यंत' असे शब्द वापरून एखादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज येउ शकेल. अर्थात हे इथे प्रतिसाद खरवडण्याइतके सोपे नाही, पण अशक्य नक्कीच नाही.

यामध्ये व्याकरण व लिपीतील 'क्शरचिन्हांचा' (व्यंजन चिन्हांचा) व 'स्वरचिन्हांचा' आप-आपसातील संबंध यामुळे काही समस्या येईल असे वाटत नाही.

नम्र सूचनाः मी संगणकक्षेत्रातला महितगार वगैरे नाही या क्षेत्राबद्दलच्या माझ्या बेताच्या माहितीचा उपयोग करून हा प्रतिसाद लिहितो आहे, त्यामुळे चूक भूल देणे घेणे.