इंद्रवज्रा वृत्त संपूर्णपणे वापरल्या जाणाऱ्या कविता माझ्या आठवणीत तरी फारच थोड्या असतील. बहुतेक सर्व उपजातीत (इंद्रवज्रा उपेंद्रवज्रा असे मिश्रण) असतील. ह्या तुमच्या कवितेत मात्र तुम्ही इंद्रवज्रेत उपेंद्रवज्रेची मिसळण कुठेही होऊ दिलेली नाही हे मला विशेष वाटले.

हे दगड धोंडे बुडवून टाका

ऐवजी

गोटे नि धोंडे बुडवून टाका

किंवा

राडा नि रोडा बुडवून टाका

असा काही बदल केलात तर वृत्त (अधिक चांगले) सांभाळले जाईल असे वाटते.