महेश, सोनाली,
प्रतिसादाबद्दल आणि इंद्रवज्रा ओळखल्याबद्दल धन्यवाद! 'छोटी बहर' असल्यामुळे हे वृत्त गझलेसाठीही मला छान वाटतं. मी यापूर्वी या वृत्तात 'प्रश्न' नावाची एक गझल लिहिली होती, आता मनोगतावर सापडत नाहीये.
महेश,
उपेंद्रवज्राची आठवणही सुंदर... ही या वृत्ताची खासियत आहे. दुर्दैवानं गझलेत तसं करता येत नाही.
'गोटे' वापरून २ लघूंचा १ गुरू करता येईल हे खरं आहे; पण 'दगड-धोंडे' मला जास्त ओघवतं वाटलं!
- कुमार
ता. क. लहानपणी 'ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे' हा या वृत्तातला श्लोक शिकलो होतो.