मला भोंडल्याचा हत्ती काढून देण्याचे खास आमंत्रण असे. बाकी मला भोंडला फार आवडला नाही तरी माझी कित्येक गाणी तोंडपाठ होती. (काही काही अनवट गाणीही मला माहीत होती. ) कित्येक वेळा मला मुली गाण्यातले शब्द विचारत. एकदा तर मी एक ओळ सांगायची आणि मुलींनी म्हणायची असे एका भोंडल्यात झाले होते! (अर्थात मी त्या मुलींहून कितीतरी लहान होतो!)

आज ह्या लेखामुळे त्या सगळ्याची आठवण झाली.