त्याचे प्रथमदर्शनी कारण तरी महाराष्ट्रात उपासाला काय काय खावे ह्याची एकवाक्यता दिसत नाही असे
असावे. तुम्ही कोणालाही म्हणा, आम्ही उपासाला क्षयज्ञ खातो. लगेच दुसरा म्हणतो, छे, बुवा आम्ही
तर केवळ कखग खातो. उदा. काहीजण मिरची खात नाहीत लाल तिखट खातात तर काही केवळ
मिरेपुड वापरतात.
मात्र साबुदाणा खिचडी व साबुदाणा थालिपीठ ह्यावर जोरात एकमत आहे. मला तर वाटते उपास हे बऱ्याच
जणांसाठी जिभेचे चोचले पुरविण्याचा बहाणा आहे.