मैफल, हर्षवर्धन, पूजा, प्रतिसादाबद्दल मनः पुर्वक आभार.
<<नाशिकमध्ये माझ्या मुलीचा हादगा केला होता. पण प्रतिसाद यथातथाच मिळाला>>
अनेकदा लोक बोलावलं तर येतात मजा करतात पण स्वतःहून पुढाकार घेत नाहीत. हम! चालायचेच, म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृती. पण आपण मजा करत रहायची. यायचं ते बरोबर माग काढतात आणि मग समान छ्ंद जुळून छान मैत्र जुळून जातं होय ना!
<<बाकी मला भोंडला फार आवडला नाही तरी माझी कित्येक गाणी तोंडपाठ होती.>>
सगळ्या मुलांना भोंडला खिरापतीसाठी मात्र नक्कीच आवडत असावा. त्यामुळे मग हळूहळू अनेक भोंडले अटेंड केल्याने गाणी पाठ होत असावीत
<<त्या दिवशी नवधान्य रुजवली जातात>>
हो. अनेक लोक धान्य पेरून घट ठेवतात आणि मग कोंब उगवले की एक दिवस बहुधा दसर्याला पुरूषांनी खिशामध्ये किंवा टोपीत ते ठेवायची पद्धत आहे