प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार!

श्री. कलंत्री व 'क्षणाचा सोबती' यांनी जो प्रतिसाद दिला आहे तो 'शक्य आहे का? ' ह्या एवढ्याच मुद्द्या पर्यंतचा आहे. ते व्हावं हि माझी हि इच्छा आहे. व त्यासाठीच मला इथं असं अपेक्षित प्रश्न होता की, हि जी हिंदवी प्रोग्रॅमिंग सिस्टम च्या मदतीने मराठीतून संगणकाला / संगणकाशी सूचनांचे व माहितीचे आदान-प्रदान शक्य आहे का ते.

चक्रधर यांच्या प्रतिसादातून चर्चा करण्यासाठी जी काही माहिती पुढे आली आहे त्या विषयी आता बोलू.

मी ही संगणकक्षेत्रातील माहितगार वा तज्ज्ञ  नक्कीच नाही. या क्षेत्राबद्दलची जी बेताची माहिती आहे त्यावरच मला असे म्हणायचे आहे की,

पहिला टप्पा : हा 'डाटा' एन-कोडिंग व त्यापाठोपाठ डि-कोडिंगचा येतो. त्या मध्ये ऑपरेटिंग सिस्टिम कडून ज्या सूचनांचे संदेश मिळतात त्यांचे शून्य आणि एक अश्या बायनरी रूपात, म्हणजेच हार्डवेअरला समजणाऱ्या भाषेत रूपांतरण होते.

बायनरी फाइल मध्ये 'मराठी अर्थात देवनागरी लिपीतील डाटा' एनकोड वा डिकोड करता येईल का? असा माझा प्रश्न होता.

हे एवढे उपद्व्याप मराठी माणसांना जमतील असे सध्यातरी वाटत नाही. ह्या साठीच ते शक्य नाही असे म्हणालो.

दुसऱ्या टप्पा: ह्या टप्प्यात चक्रधर यांनी सांगितल्या प्रमाणे :- प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिम (उदा. Windows) मध्ये उपयोगकर्त्यांसाठी एक सूचनांचा संच असतो ज्याला ऍप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस(API) असे म्हणतात. Compiler आपण लिहिलेल्या प्रोग्रॅमचे API सूचनांमध्ये,  म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टिमला समजणाऱ्या भाषेमध्ये रूपांतर करतो.

तिसरा टप्पा: ऑपरेटिंग सिस्टिम या रूपांतरित सूचनांचे शून्य आणि एकच्या (बायनरी) म्हणजेच हार्डवेअरला समजणाऱ्या भाषेत रूपांतर करते. प्रोग्रॅम execute करताना या बायनरी सूचना हार्डवेअरला दिल्या जातात.

वर उल्लेखिलेली हिंदवी प्रोग्रॅमिंग सिस्टम कोणत्या  टप्प्यावर उपयोगात येऊ शकते हे मला कळू शकलेले नाही. म्हणूनच चर्चेद्वारे मी विचारलेले होते.

यामध्ये व्याकरण व लिपीतील 'क्षरचिन्हांचा' (व्यंजन चिन्हांचा) व 'स्वरचिन्हांचा' आप-आपसातील संबंध यामुळे काही समस्या येईल असे वाटत नाही.

इंग्रजी पर्यायी रोमन लिपीत प्रत्येक वर्णाक्षर एकापुढे एक ठेवता येतात व त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र क्रमांक देता येऊ शकतात. उदा. 'A,'B','C','D','E'. जसे 1, 2, 3, 4, 5  बायनरी फाइल बनविण्यासाठी हे उपयोगाचे आहे. परंतु मराठी पर्यायाने सध्याच्या देवनागरी (च्या बाळबोध) लिपीत काही वर्णाक्षरांना 'अ' ह्या स्वराची दर्शनीय स्वरूपात दांडी आहे व काहींना 'अ' ह्या स्वराची दांडी आहे पण ती आहे आपल्या मनात, दर्शनीय स्वरूपात मात्र दांडी लिहिली जात नाही.

उदा. :- 'भाकरा नांगल धरण'-

इथं 'भ' ला दोन दांडी मिळाली व 'भ' चा 'भा झाला. परंतु 'र' ला एक दांडी आहे परंतु ती आहे 'मनातल्या-मनात'.

तीच अवस्था 'ल' ची वेगळ्या पद्धतीने 'ल' लिहिला तर त्याला एक दांडी आहे व आता मनोगतवर जसा दिसतो आहे तसा लिहिला तर त्याला दांडी नाही.

हि विचित्र पद्धत अस्तित्वा असल्यामुळेच वर्णाक्षरांना ठराविक क्रमांक देता येऊ शकत नाहीत व त्यायोगेच जोपर्यंत ह्या विचित्र पद्धतीमध्ये सुधारणा स्वीकारल्या जात नाहीत तोवर, 'मराठीतून प्रोग्रॅमिंग भविष्यातरी शक्य होईलही असे वाटत नाही' असे मी म्हणालो.