वर उल्लेखिलेली हिंदवी प्रोग्रॅमिंग सिस्टम कोणत्या टप्प्यावर उपयोगात येऊ शकते हे मला कळू शकलेले नाही
ऑफिसमध्ये जालावरून सॉफ्टवेअर उतरवून घेण्यास बंदी आहे, त्यामुळे सध्यातरी ही हिंदवी प्रणाली नक्की काय करते हे मला सांगता येणार नाही. इतरत्र कुठे चाचणी करता आल्यास बघेन. सध्या इतर मुद्द्यांविषयी-
परंतु 'र' ला एक दांडी आहे परंतु ती आहे 'मनातल्या-मनात
हे समजले नाही. 'भाकरा' मध्ये आपण र च्या पुढे एक काना नेहेमीच देतो, मनातल्या-मनात नाही.
माझ्या समजुतीप्रमाणे तुम्हाला 'धरण्' आणि 'धरण' यासारख्या शब्दांबद्दल* म्हणायचे होते. या अडचणीकडे जाण्यापूर्वी प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या देवनागरीकरणाविषयी परत थोडेसे. हे देवनागरीकरण अनेक पातळ्यांवर करता येईल. आपण जो Compiler वापरतो(उदा. व्हिज्युअल स्टुडिओ, जावा इक्लिप्स) त्यात मनोगतासारखी प्रणाली वापरून मराठीतून प्रोग्रॅम लिहिण्याची सोय करता येईल. Compiler या प्रोग्रॅमचे API functions मध्ये रूपांतर करेल जी ईंग्रजीतच असतील. यात तुमच्या मताप्रमाणे अडचणी येऊ शकतील कारण मराठी शब्दांचे unique representation नसते. 'जर' हा शब्द jar आणि jara असा लिहिला जाऊ शकेल. (हे अगदी साधे उदाहरण घेतले इतरही देता येतील). पण या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते, प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा संच हा बऱ्यापैकी मर्यादीत असतो. त्यामुळे एका शब्दाची अनेक representations असली तरीही २/३ प्रकारे लिहिल्या जाणाऱ्या शब्द बरोबर Compile करणे Compiler ला शक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ईंग्रजीतसुद्धा Compiler चे कीवर्डस हे standerdized असतात. ते तसेच लिहावे लागतात. (उदाः बोलताना if...otherwise.. चालत असले तरीही प्रोग्रॅममध्ये if...else... असेच लिहावे लागते) हे बंधन मराठीतही पाळल्यावर अनेक समस्या सुटतील.
यातल्या काही समस्यांचे मूळ आपण ईंग्रजी कीबोर्ड वापरून मराठी लिहितो यातही असेल. देवनागरीकरण पुढच्या पातळीवर नेल्यास, म्हणजेच ऑपरेटींग सिस्टीम हिच मराठीतून असल्यास आपोआप कीबोर्डही मराठीच असेल आणि या समस्या येणार नाहीत असे वाटते.
* तुम्हाला हा अर्थ अभिप्रेत नसल्यास कृपया आणखी काही उदाहरणे द्यावीत.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.