चेतन१२३पी
१) तुम्ही नमूद केलेल्या २, ३ आणि ४ निकषांसाठीचे पुरावे ( प्रमाण हो; प्रमाद नव्हे! ) येथे तपशिलात नाही; तरी थोडक्यात सादर करू शकाल काय? म्हणजे मग तुमच्याबरोबरच इतरांनाही ती माहिती मिळू शकेल.
तुम्ही संपूर्ण महाभारत वाचलेले आहे / असावे, हे मी येथे गृहीत धरलेले आहे; पण त्याशिवाय महाभारतावरील कोणकोणते संशोधनपर ग्रंथ आजवर तुम्ही वाचलेले आहेत?
२) `महाभारताचा उगम मध्य पूर्वेत` हा अ. ज. करंदीकरलिखित ग्रंथ तुम्ही जरूर जरूर वाचावा, असे मी तुम्हाला सुचवीन.
बाकी, महाभारत या विषयावर डोळस चर्चा जेवढी होईल, तेवढी हवीच आहे....