दोन्ही चित्रपट पाहिले... मोजमापाची वेळ आली तेव्हा 'वळू' उजवा वाटला.. 'सज्जनपूर' थोडा भरकटत जातो असे वाटत राहते. शेवटी मात्र चांगलीच पकड घेतो, परंतु, तोवर हा चित्रपट बघण्याचा संयम आटलेला असतो. तुकड्यांनी जोडल्यागत वाटतो, याउलट 'वळू' बैलाला पकडण्याच्या एकाच कथानकावर तग धरून उभा राहतो आणि घडण्यार्या इतर घटना त्याच्या बरोबर चालत राहतात...!