लोकहो,
मी नुकताच "मनोगत" चा सदस्य झालो आहे. मी मुळचा पुण्याचा असून पुण्याविषयी एक ब्लॉग मी नुकताच सुरु केला आहे.
ह्याचा मूळ उद्देश हा पुण्याविषयी सर्व माहिती एका ठिकाणी संकलित करता यावी हा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे पुण्याविषयी अशी काही ना काही माहिती असेल की ज्याचा इतरांना नक्कीच फायदा होईल.
उदा: मी माझ्या पहील्या लेखात म्हटल्याप्रमाणे पुण्यात आजघडीला चांगले ब्रॉडबॅन्ड कनेक्शन कोणते आहे?
आपल्या सर्वांच्या साहाय्याने पुण्याविषयी उपयुक्त माहितीची देवाणघेवाण करायचा विचार आहे...
~ कौ