वाचायला कसेतरीच वाटले. बहुधा व्यासोच्छिष्टम् असावे.
महाभारतात वीज होती. ती आकाशातून पडत असे. आकाशवाणी तर होतीच होती. दूरदर्शनही होते. उगीच नाही संजय धृतराष्ट्राला युद्धाचे चक्षुर्वै सत्यम् वार्तांकन करीत होता. वास्तुशास्त्रतर कमालीचे प्रगत होते, हे मयसभेच्या वर्णनावरून स्पष्ट होते. टेलिग्राफी आणि टेलिफोनीची पुढची पायरी टेलिपथी, तिचा शोध लागलेला होता. कलियुगात जे शोध अजून लागलेले नाहीत तसले प्रजननशास्त्रातले बरेच शोध लागून त्यांचा व्यवहारात उपयोग होत असे. एकेकाळी पृथ्वीवर राहात असलेल्या देवांनी महाभारतकाळात परग्रहांवर वसती केली होती आणि तिथून ते पुष्पवृष्टी वगैरे करीत असत. अशा या अफाट प्रगतीपर्यंत पोहोचायला आपल्याला अजून एखादे युग प्रतीक्षा करायला पाहिजे.