महाभारत हा खरोखर एक मनोरंजनाचा कधी न आटणारा झरा आहे.

मी महाभारत सगळे वाचलेले नाही. मात्र त्यातल्या कित्येक गोष्टी नातेवाईक, विचारी लोक शिक्षक तज्ज्ञ यांच्याकडूनच ऐकलेल्या आहेत. कित्येक वर्ष ऐकत आहे. महाभारतातल्या गोष्टी मनोरंजक आहेत त्यात वादच नाही; पण त्याबरोबरच त्यातल्या वैज्ञानिक प्रगतीचे दाखले देणारे अचाट दावे असूदेत किंवा अश्या दाव्यांची गोडशब्दात न चुकता उडवलेली खिल्ली असूदे, ह्या दोन्ही गोष्टी मूळ गोष्टींच्या तोडीस तोड मनोरंजन करतात हेही तितकेच खरे.

दोन्ही बाजूचे लोक ह्या दोन्ही गोष्टी अगदी जीव तोडून करत असतात्त. मनापासून करत असतात. मला वाटते गेली हजारो वर्षे हेच चालू आहे. त्यात खंड नाही. दोन्ही लोक कधी थकत नाहीत. वैफल्यग्रस्त होत नाहीत, एकमेकांचा नाद सोडत नाहीत की काही नाही.

हजारो वर्षे मनोरंजनाचा हा झरा निखळपणे वाहत आहे. जगात इतर कुठल्याच साहित्यकृतीला इतकी रंजकता लाभलेली नसेल असा माझा दावा आहे!

(हो, आता ह्या दाव्याची खिल्लीही तुम्ही चमक्दार शब्दात उडवा बरका! तेवढेच आणखी मनोरंजन)