आजकालच्या जवळजवळ सर्व संगणक प्रणालींवर [Mac OS X व लिनक्सवरसुद्धा (SCIM वापरून)] मराठीमधून लिहीण्यासाठी IME उपलब्ध आहेत. मी त्या सर्व फायरफॉक्सवर वापरून बघितल्या आहेत. आपणही त्या वापरून बघाव्यात जेणेकरून आपणांस अन्य आज्ञावलींचा वापर करण्याची गरज पडणार नाही.

तसेच मी फायरफॉक्सच्या मराठी भाषांतराच्या उपक्रमामध्ये सध्यातरी सहभागी नाही. परंतु हातभार लावण्याची इच्छा आहे. याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास जरुर सांगा.