मूळ व्यासांनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक किती? सौतीने त्यात भर किती घातली? वैशंपायनांनी जोडलेले श्लोक किती? मूळ महाभारतात कोणकोणत्या नव्या गोष्टी वाढत जाऊन महाभारताचे मूळ श्लोक फुगत गेले? प्राचीन भारतातील जनपदे आणि महाजनपदे यांनी आपापल्या वंशाचे नाव उज्वल व्हावे म्हणून त्यांचा उल्लेख महाभारतात यावा अशी तजवीज केली का? काव्य आणि इतिहास हे एकमेकांपासून कसे वेगळे काढावेत?
कोणत्याही महाकाव्यात ग्रह ताऱ्यांचा उल्लेख नाही म्हणताना आपण जगभरातील किती महाकाव्ये तपासलीत?
महाकाव्यात शस्त्रास्त्रांचा उल्लेख येणे का शक्य नाही हे तर अजिबात कळले नाही. तेव्हा यासर्वांवरही प्रकाश टाकून आम्हाला उपकृत करावे.
ऋग्वेदाचा काळ सुमारे २५००० वर्षांपूर्वीचा आणि श्रेय वर्तकांना!! शक्य आहे, ते सूक्ष्मरुपाने २५००० वर्षांपूर्वी भ्रमण करून आले असावेत.