आपण म्हटल्याप्रमाणे "मायक्रोसॉप्ट" ला मी ही (की मीच?) माझ्या एका प्रतीसादात "अतिसुक्ष्ममृदु" म्हटले आहे खरे. पण तो उल्लेख विनोदाने केलेला असून त्यामागे त्यांच्या अस्तित्वाचा 'अति'रेक सुचवायचा होता. शिवाय, ते एका विशिष्ट संस्थेचे नाव असल्याने त्याच्या भाषांतराचा प्रश्नच उद्भवत नाही.

मायक्रो बद्दल मला सुक्ष्म पुरेसा वाटतो. शिवाय मिनी हा शब्द शास्त्रीय परिभाषेत वाचल्याचे स्मरत नाही, असल्यास त्याला लघु (हा ही खरं तर मला फार मोठा शब्द वाटतो) किवा छोटा/छोटेखानी (अशास्त्रीय) योग्य वाटतो.

आणि हो! आपल्याला नॅनो साठी ही शब्द पाहीजेच ना? 

की सरळ किलो, हेक्टो, डेका प्रमाणे मायक्रो,मेगा,नॅनो आहेत तसे उचलावेत?

मी आशुतोष