,चेतन१२३प,
- पुरावे देण्याची तुमची ही रीत भलतीच 'उत्कंठावर्धक ' आहे. पुढील भागात... पुढील भागात...!!!
- डॉ. प. वि. वर्तक यांच्यावरच तुमची सारी मदार दिसते!!! मग काय...!!!
'ब्रह्मर्षीची स्मरणयात्रा' हे वर्तकसाहेबांचे पुस्तक तीनेक महिन्यांपूर्वी मी झपाट्याने वाचून काढले होते.. इतके अफलातून (आध्यात्मिक) चरित्र मी तरी याआधी कधी अन्य कुठले वाचले नव्हते!!! त्यांचा मंगळाबाबतचा स्मूक्ष्मानुभव माझ्या स्थूल डोक्यात शिरता शिरला नाही... त्यावर काही मित्रांशीही बरीच चर्चा केली; पण माझे डोके स्थूल ते स्थूलच राहिले!!!
- काही वेगळे, विश्वासार्ह पुरावे ( निकष [ :) ] क्रमांक २, ३ व ४ यांच्या संदर्भात) तुम्ही द्यायला हवेत. पुढील भागात जरूर द्या :). मी तुमच्या पुढील भागाची वाट उत्कंठेने पाहत आहे.
..............
- दुरुस्ती - 'महाभारताचा उगम मध्यपूर्वेत ' या शीर्षकाचे पुस्तक मी तुम्हाला वाचण्यासाठी सुचवले होते... पण पुस्तकाचे शीर्षक ते नसून 'महाभारताची पार्श्वभूमी - पश्चिम आशिया ' असे आहे...
अ. ज. करंदीकर यांच्यावरील एक लेख (कात्रण) मी मागे वाचला होता. त्या लेखात 'महाभारताचा उगम मध्यपूर्वेत' असे काहीसे सोदाहरण प्रतिपादन होते. तुम्हाला पुस्तकाची शिफारस केली, त्या वेळी डोळ्यांसमोर तोच लेख होता..आणि त्यामुळे जरासा घोळ झाला... असो. चुकीचे नाव सांगितले गेल्याबद्दल क्षमा असावी.
'महाभारताची पार्श्वभूमी - पश्चिम आशिया' (अ. ज. करंदीकर) हे पुस्तक आता दुर्मिळ या प्रकारात मोडते. पुण्याच्या 'शुभदा सारस्वत' या प्रकाशन संस्थेने ते १९८० मध्ये प्रकाशित केलेले आहे.