सृष्टीलावण्या,

ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.याला बाब म्हणण्यापेक्षा मी शक्ती म्हणेन. एखाद्या प्रांतात फिरत असताना, मग तो कितीही अनोळखी असो, त्याचा नकाशा तुमच्या मनात तयार होतो. खरंतर ही एक विलक्षण शक्ती आहे. आणि याचा व्यवहारात उपयोग नाही कसा? समजा तुम्ही एखाद्या भागात गेलात आणि तिथे एखादी घटना घडली असेल. तुम्ही ती पाहिली असेल नसेल पण किमान तुमच्या या शक्तीचा वापर करून तो भाग पटकन सांगू शकाल. शोधकार्यात मदत होऊ शकेल. कुणी परिचिताला त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही ही शक्ती "गाईड" होऊ शकेल.

समजा तुमच्या एखाद्या दूरच्या पाहुण्याला एखाद्या भागात यायचे आहे, विशेषतः मुंबईतल्या एखाद्या भागात; हाच नकाशा तुम्ही चित्ररूपाने पाठवून त्याला मदत करू शकाल.

बरेच फायदे आहेत.

माझा एक मित्र आहे संजय पाटील, त्यालाही हे जमतंय. खरंतर मी देखील असा मनात नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, पण नाही जमत. पण तुमच्याकडे ते उपजतच आहे, फारच छान!!

----------------------------कृष्णकुमार द. जोशी