आमच्या परिचयातील एक गृहस्थ एक महिना केवळ ताजे (तांब्याच्या भांड्यात ४ पंचमुखी रुद्राक्ष ३.७१ दिवस घालून ठेवलेले... म्हणजे फक्त रुद्राक्षच ३.७१ दिवस ठेवायचेत हो, पाणी नाही. नाहीतर ते ताजे कसे राहणार, नाही का?) पाणी पिऊन राहिले होते. त्यांना कुठलाही थकवा जाणवला नाही. त्यांचे वजन ३ किलोने कमी झाले खरे पण रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ३.५७ पटीने वाढल्याचे लक्षात आले आणि लिपिड प्रोफाइल पाहिल्यावर कोलेस्टरॉल कमी झाल्याचेदेखील निदर्शनास आले. त्यासोबतच शरीराला हानिकारक असे एल्डिएल (लो-डेन्सिटि लिपोप्रोटीन) कमी होऊन उपकारक एच्डिएल (हाय्-डेन्सिटी लिपोप्रोटीन) वाढल्याचेही लक्षात आले.

तर असे हे पाणी. त्याला संस्कृतमध्ये जीवन असे म्हणतात ते उगीच नाही. संस्कृत भाषेचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे आहे. तेव्हाच अशा उपयोगी गोष्टी आपल्या व्यवस्थित लक्षात येतील आणि त्यांचा अखिल मानवजातीला फायदा होईल.

ता.क.: - वरील माहिती कोणीही गांभीर्याने घेणार नाही अशी खात्री आहे.