काय म्हणता? भारताचा क्रमांक खाली गेला! अरे बापरे! हि तर अगदी आणिबाणी ची स्थिती आहे. आपण सर्वांनी ह्याविषयी काही तरी करायला हवे. भारताने प्रत्येक बाबतीत आपला क्रमांक हा वरचा ठेवायलाच हवा मग भले तो विषय भ्रष्टाचाराचाही असे ना का?
मुळात हि सर्व सर्वेक्षणे अगदी मोजक्या व जुजबी स्वरूपातील असतात. व जे म्हणताहेत ते हि कदाचित सरकारी कामात सरकारी बाबू पैसे घेतात कि नाही यावर असू शकतील. त्यामूळे परदेश्यांच्या अशा निष्कर्षांकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. आर्थिक भ्रष्टाचाराची अनेक रूपे असतात. ह्या मंडळींनी त्याचा अभ्यास केला आहे का? काही मंडळी 'पैसे घेवून काम करतात तर काही पैसे घेवूनही काम करत नाही, ह्या ला कोणते नाव द्यायचे?