चेतन१२३प,
आपली इतिहासाची (तोड)फोड उच्च आहे.
इतिहास = इति + आ+ आस
अहाहा... किती सुंदर! इति + आ + आस...
म्हणजे ज्या गोष्टीची आपण आस लावून बसलो होतो तो इतिहास तर नव्हे हा?
वाहवा, वाहवा!
इति = एकदा... इति ह्या शब्दाचा नवीन अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद! तसेच 'आ = असे' आणि 'आस (अस्-अस्) = घडले' बद्दलही आपले मानावेत तितके आभार कमीच आहेत. (पण, हे अस्-अस् असे दोनदा का? कदाचित, टंकराक्षसाची कमाल असावी. अहो, हा टंकराक्षस कधीपासून अस्तित्वात आहे हो? महाभारतकालापासून का? का त्याही आधीच्या रामायणकालापासून? कारण कुठेतरी असे वाचल्याचे स्मरते की त्याकाळीचे प्रिंटर आणि स्कॅनर आत्ता उपलब्ध असणाऱ्या प्रिंटर आणि स्कॅनर पेक्षाही प्रचंड मोठ्ठे१ आणि शतपटीने वेगवान असे होते. एकदा ब्रम्हर्षींना विचारून घ्या ना गडे! 'ना गडे' लिहिताना मी मुद्दाम काळजी घेतली आहे, नाहीतर इथेही टंकराक्षसाने आपले अस्तित्व दाखवले असते.)
पण, 'इति + आ + आस' मध्ये कुठेही 'ह' येत नाही हो. संस्कृतात संधी होताना जसा काही अक्षरांचा लोप होतो तशीच बहुतेक काही अक्षरे नव्याने येत असावीत. का आपणाला 'इति + हा + आस' असे म्हणावयाचे होते? पण मग 'हा आस' कसे? 'ही आस' हवे. कारण 'आस' हा स्त्रीलिंगी शब्द आहे, पुल्लिंगी नाही. का आपणाला 'इति + आ + हास' असे म्हणावयाचे होते. म्हणजे वाचकाला आपण असे सांगू इच्छिता की ही केलेली फोड पाहून तू हास.
काय ते एकदा स्पष्ट करा पाहू. आपल्या पुढील भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. (अरेरे... इथे मात्र टंकराक्षसाने त्रास दिलाच. 'आपल्या' आणि 'पुढील' ह्या दोन शब्दांमध्ये 'लेखाच्या' हा शब्द घालायचा राहूनच गेला.)
१आता प्रिंटर आणि स्कॅनरबाबत आकार मोठा असणे हे कमीपणाचे लक्षण आहे असे दाखविण्याचा भोचकपणा कोणीही करू नये ही नम्र विनंती.