पुरावे देऊन एखादी गोष्ट सिद्ध करणे याबाबतीत वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत असे दिसते. संकेतस्थळांवर होणाऱ्या चर्चांमध्ये बिनधास्त विधाने केलेली बरेचदा दिसतात. यामुळे फार कमी चर्चांमध्ये शेवटी निष्कर्ष काढता येतो.
वर दिलेल्या कृतीला इलेक्ट्रोप्लेटींग म्हणता येईल किंवा नाही याबद्दल शंका आहे. शिवाय दिलेली कृती प्रत्यक्षात करून बघितल्यावरच नेमके काय होते ते कळेल. फक्त एखाद्या श्लोकात वर्णन आहे म्हणून लगेच आपले पूर्वज आधुनिक होते असा निष्कर्ष काढणे कितपत बरोबर आहे? मला वाटते अशा चर्चांमध्ये शेवटी संदर्भांची सूची देणे आवश्यक करायला हवे. असो. (किंवा फक्त वर्तक इतका संदर्भ दिला तरी चालेल.
)
भांडारकर संस्थेमध्ये महाभारताची संशोधित प्रत आहे. महाभारतामध्ये इ.स्.पू. ५०० ते इ. स. ७००-८०० या कालावधीत विविध
प्रतींमध्ये भर घातली गेली. मुद्दा असा की मूळचे काय आणि
भर घातलेले काय? इ.स्.पू. ५०० च्या
आधी मूळ महाभारत लिहीले गेले, पण त्याचा नक्की कालावधी अजूनही निश्चित
नाही. वेदांमध्ये महाभारताच्या कथेचा उल्लेख नाही. त्यामुळे याची रचना
वेदांच्या रचनेनंतर झाली असे मानण्याला वाव आहे. याखेरीज महाभारतात
बर्याच गोष्टींचा उल्लेख नाही. उदा. साखर, रेशीम, काच, चलनी नाणी
इत्यादी. याचा अर्थ महाभारताचा काल या वस्तू वापरात येण्याच्या आधीचा असला
पाहिजे.
(
संदर्भ : महाभारत : एक पुरातत्वीय दृष्टीकोन, गौरी लाड, भा. इ. सं. मं. त्रैमासिक : १ जुलै १९८५)
२०००० वर्षांपूर्वी शीतयुग चालू होते. माणसाच्या संस्कृतीच्या पहिल्या खुणा १०००० वर्षांपूर्वीच्या आहेत. शेतीचा शोध साधारण त्याच काळातला. असे असताना वेदांचा काळ इसपू २३००० वर्षे आहे याला कुठलाही पुरातत्वशास्त्राचा आधार नाही (वर्तक सोडून).
हॅम्लेट