मी आधीच लेखामध्ये लिहिले आहे कि,
......आज "रॅशनल सायंस" महाभारताला ऐतिहासिक पुरावे देउन सिद्ध करू शकत नाहि.
मी स्वतः "केमेस्ट्री"चा थोडाफार अभ्यास केलाय. त्यावरून हे नेश्चित सांगतो की, पाश्चात्यांच्या भाकरी भाजणारे सर्व जग याला इलेक्ट्रोप्लेटिंगच म्हणतात. आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ म्हणजे इलेक्ट्रिसिटी च आहे. .........संदर्भ ( केसरी २१/०९/१९५२, ५/१०/१९५२ ग. वि. केतकरांचे लेख )
२०००० वर्षांपूर्वी शीतयुग चालू होते. माणसाच्या संस्कृतीच्या पहिल्या
खुणा १०००० वर्षांपूर्वीच्या आहेत. शेतीचा शोध साधारण त्याच काळातला.
कृपया हा शोध कोणाचा आहे ते नमुद करावे. किंवा त्याला संदर्भ द्यावा. कारण, काही लोकांच्या मते शितयुग हे १५००० वर्षांपुर्वी झाले आहे.
बायोलॉजीनुसार, क्रोमॅग्नॉन माणवाने निअँडरथल माणवाला "र्रीप्लेस" केले. आणि त्याचा "स्कल" हा १५००सी. सी. "वॉल्युम"चा होता.
तो साधारण २५०००वर्षापुर्वी झाला आहे.
आजचा माणसाचा "स्कल" हा १४५०सी. सी. "वॉल्युम"चा आहे. तेंव्हा, आपल्यापेक्षा तो सुज्ञ होता.
याला संदर्भ म्हणजे सि. बि. ऍस. इ. बोर्डाचे ११वी चे बायोलॉजी चे पुस्तक (सरकारमान्य ).
स्वतःच्या तत्त्वज्ञानावर विश्वास न ठेवणारऱ्या आम्हासाठी आणखी एक चांगली बातमी आहे.
इजिप्त देशातिल पिऱ्यामिड मध्ये उत्खननादरम्यान एक लाकडी मुर्ती आढळली आहे. त्यावर गितेतिल पुनर्जन्माविषयिचा अनुवाद तंतोतंत कोरलेला आहे. त्या मुर्तीबरोबर इतर वस्तू मिळाल्या आहे त्यादेखिल भारतियच असल्याचा दावा आहे. आणि तेथिल संशोधकांनी त्या मुर्तीचा काळ इसवी सन पुर्व ३००० च्या जवळपास निश्चित केला आहे.
महाभरतामध्ये मयसभेचा उल्लेख असून आपण साखर, काच शोधत आहो यापेक्षा आश्चर्य काय असू शकते? शिवाय लाक्षाग्रुहासठी वापरली जाणारी साधन सामुग्री सुद्धा लक्षात घ्यावी. "अश्वमेध" मध्ये अश्वमेध यज्ञाविषयी विस्त्रुत विवेचन आहे.
उत्खननावरच संपुर्ण भिस्त ठेवणे बरोबर वाटत नाहि. कारण,
गंगेच्या खोऱ्यात झालेल्या उत्खननात हत्ति, वाघ यांची चित्रे आढळलीत. पण घोड्याची नाहि. आणि महाभारतामध्ये घोड्यांचा स्प्ष्ट उल्लेख आहे. गंगेच्या खोऱ्यातील लोकांना यावरुनच इ. पु. ११००-१२०० मध्ये घोडे माहित नव्हते असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे महाभारत
इ. पु. ११००-१२०० च्या आधिचे वाटत नाहि. हा सिद्धांतही खराच. पण, मग त्या उत्खननात बायकांची चित्रे देखिल नाहित म्हणून त्या लोकांना बायका माहित नव्हत्या असे म्हणुया काय?
ऋगवेद हे महाभारतपेक्षा प्राचीन हे आपणच मान्य करता. ऋगवेद ७:३३, १०:१३ मध्ये वसिष्ट व अगस्ती हे मित्रावरुणाच्या विर्यापासून एका कुंभातून जन्मले असा उल्लेख आहे. पाश्चात्यांनी "टेस्ट ट्युब बेबी" जगाला दाखवली म्हणून भल्या भल्या वेदांना अंधश्रद्धा ठरवणारे गप बसलेत. व हा तोच प्रयोग असू शकतो हे मान्य केले. अन्यथा हि गोष्ट सुद्धा काल्पनिकच म्हणावी लागली असती.