>>तेव्हा जनसंघ होता. नंतर तो जनता पक्षात विलीन झाला. पुढे जनता पक्षाचे तुकडे झाले. जुना जनसंघ त्यातून बाहेर पडून त्याचाच भाजप झाला, असे आठवते.<<

मूळ प्रजापक्ष आणि समाजवादी पक्ष होते, ते मिळून प्रजासमाजवादी झाला. त्यातून बाहेर पडून लोहियावादी पक्ष झाला, ते परत एकत्र मिळून संयुक्त समाजवादी झाला. हल्ली एक समाजवादी, एक बहुजन समाजवादी आहे, आणि एक डेमोक्रॅटिक समाजवादी आहे. ते कसे बनले ते आठवत नाही.

आंबेडकरांच्या अगोदर शेड्यूल्डकास्ट फेडरेशन नावाचा पक्ष होता, त्याच्यातल्या काहीजणांचा रिपब्लिकन झाला.  पुढे फाटाफूट होऊन सुमारे ३५ रिपब्लिकन कोब्रा/पॅन्थर वगैरे पक्ष  या घडीला आहेत.  त्यांची यादी एकदा वर्तमानपत्रात आली होती, कुणी जपून ठेवली असेल तर येथे द्यावी.  कम्युनिस्टांतही डावे-उजवे-जहाल-मवाळ-माओवादी-रशियावादी-नक्षलवादी वगैरे पक्ष आहेत.

काँग्रेसचे  उपपक्षः  जहाल, मवाळ,  (इंडिकेट)इंदिरा, चड्डी(चव्हाण-रेड्डी), सिंडिकेट, राष्ट्रवादी वगैरे.

द्रमुक, अण्णाद्रमुक, पी‌एम्‌के वगैरे ५-६ पक्ष आहेत.