खरे आहे. मी तर म्हणेन प्रत्येकाने थोडेसे वेडे असायची फारच गरज आहे.  प्रत्येकजण 
केवळ शहाणा, हुशार आणि आपली न्यूने झाकणारा राहिला तर समाजाचा तोल ढासळेल.  
मात्र हा वेडेपणा आपल्याला आनंद देणारा आणि समाजाचे नुकसान न करणारा हवा.  जसे 
फुलदाणीत जर विविधरंगी, वेगवेगळ्या आकाराची, वासाची फुले असतील तर ती अधिकच 
शोभून दिसतात. तसेच समाज हा विविध प्रकारच्या रीतींनी, बोलींनी, माणसांनी युक्त असावा.