ज्या घरात फराळांसोबत दिवाळी अंकांची मेजवानी नसेल ते मराठी घर म्हणायचे तरी कसे? आणि जो मराठी वाचक जुने दिवाळी अंक जतन करून शिळ्या पण खुसखुशीत पुरणपोळीप्रमाणे त्या दिवाळी अंकांचा वर्षानुवर्षे आस्वाद घेत नाही त्याला मराठी वाचक म्हणायचे तरी कसे?