मराठीतला पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये का. र. मित्रांनी काढला होता. त्या घटनेला आता शंभर वर्षं होतील. त्या अर्थाने ही चर्चा अगदी समयोचित म्हणावी लागेल. यानिमित्ताने दादरच्या आयडियल पासून सिद्धिविनायकापर्यंत ग्रंथपालखी काढण्यात येणार असल्याची बातमी अलीकडेच वाचनात आली होती. बाकी मौज, अक्षर, अंतर्नाद, ललित, शब्द सारखे दर्जेदार अंक अजूनही निघत आहेत हे चांगले लक्षण आहे.