नाहीतर मग उगाच कधीतरी चॉकलेट, चीज, केक असं खावंसं वाटतं आणि मग वजन वाढून बसतं.
कधीतरी चॉकलेट, चीज, केक, चीजकेक, आईसक्रिम खायला हरकत नाही हो. भारतातही कधीकधी श्रीखंड, गुलाबजाम, साजूक तुपाने निथळणारी पुरणपोळी, पेढे-बर्फी होतेच ना. हे सर्व कधीतरीच खावे. प्रश्न असा आहे की अमेरिकेत या गोष्टी सुपरमार्केटमध्ये सतत नजरेसमोर दिसतात आणि खाव्याशा वाटतात. भारतातील मॉल्सची संख्या मोजली तर तिथेही आता अशा गोष्टी सतत नजरेस पडत असाव्यात.
भांडीवाली बाई? नाही ना मिळत इकडे एवढ्या सहज! आणि dishwasher?
भांडीवाली बाई सहज मिळेल. अगदी कपडे धुवून घड्या करून देणारी, घर झाडूनपुसून स्वच्छ करून देणारी, बाथरुम-संडास लखलखीत करून देणारीही मिळेल पण ती परवडायला हवी ना. बाकी, डिशवॉशरबद्दल खरेच. अर्धी भांडी घासून मग त्यात विसळून, सुकवणे इतकाच डिशवॉशरचा उपयोग आणि जागच्या जागी उभं राहून भांडी घासल्यावर वजन कमी होत नाहीच.
शिवाय स्वयंपाक करणे, भांडी घासणे अशा कामांशी पण फारसा संबंध आला नाही.
या कामांशी संबंध हल्ली लग्न झाल्यावरच अनेकांना येत असावा. होईल सवय हळूहळू.
मग करा सगळं स्वतःच! सारखी सारखी भांडी घासायला लागली की परत तोच प्रश्न पडतो!
सारखी सारखी भांडी घासू नका तुम्ही नवरा असेल तर त्याला लावा आठवड्यातून अर्ध्यावेळेस डिशवॉशर लावायला की प्रश्न सुटला.
माणसाचा जन्म खाण्यासाठी झालेला असतो. तेव्हा भरपूर खा. भरपूर काम करा आणि भरपूर व्यायाम करा की तक्रारी आपसूक दूर होतील.