"मराठीतून आज्ञावली" हा शब्दप्रयोग थोडा फसवा आहे. सी / सी ++ / जाव्हा वगैरे "संगणक भाषा" आहेत, ज्या रोमन लिपी वापरतात.
त्यांचे व्याकरण (सिंटॅक्स) स्वतंत्र असते, म्हणजे त्याचा इंग्रजी व्याकरणाशी संबंध नसतो. ह्या भाषांमध्ये लिहिलेला प्रोग्रॅम कंपाईल केल्यावर त्याचे संगणकाला समजेल अशा भाषेत (बायनरी) रूपांतर होते.
हिंदवी मध्ये फरक इतकाच दिसतो की तिथे प्रोग्रॅम लिहिण्यासाठी रोमन लिपी ऐवजी देवनागरी लिपी वापरली आहे - आणि तिचे व्याकरणही ठरवलेले आहे - त्याचा मराठी व्याकरणाशी / विरामचिन्हांशी काही संबंध नाही. हिंदवी मध्ये देवनागरीत लिहिलेला प्रोग्रॅमही कंपाइल झाल्यावर बायनरी रूपांतरच होते.
अशा रीतीने तयार झालेली बायनरी फाईल (एक्झीक्यूटेबल) दिली असता मूळ प्रोग्रॅम सी भाषेत होता की हिंदवी हे सांगणे जवळजवळ अशक्य असेल.
त्यामुळे हिंदवी मध्ये फक्त थातुरमातुर प्रोग्रॅम लिहिता येईल असे नाही, तर त्याचा कंपायलर जे काही करू शकतो ते सर्व करता येईल.
बाकी मुद्दे वर चक्रधर यांनी सविस्तर स्पष्ट केलेलेच आहेत.
-अमित