अमित कुलकर्णी, आपण चर्चेतील माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद!
"मराठीतून आज्ञावली" हा शब्दप्रयोग थोडा फसवा आहे. सी / सी ++ / जाव्हा वगैरे "संगणक भाषा" आहेत, ज्या रोमन लिपी वापरतात.
हा मुद्दा मी मान्य करतो. मराठी भाषेतून मराठी भाषकांनी त्यांच्या विचारपद्धतीनुसार संगणक आज्ञावली तयार करता येवू शकेल का? असं मी आता म्हणू शकतो का? भाषेला रूप नसतं ते प्राप्त होतं तिच्या लिपीमुळे.
सी / सी ++ / जाव्हा वगैरे "संगणक भाषा" आहेत, ज्या रोमन लिपी वापरतात.
त्यांचे व्याकरण (सिंटॅक्स) स्वतंत्र असते, म्हणजे त्याचा इंग्रजी व्याकरणाशी संबंध नसतो. ह्या भाषांमध्ये लिहिलेला प्रोग्रॅम कंपाईल केल्यावर त्याचे संगणकाला समजेल अशा भाषेत (बायनरी) रूपांतर होते.
मुद्दा क्रमांक दोनः सध्या ज्या लिपीला आपण देवनागरी लिपीला म्हणतो तिला इथं आपण 'बाळबोध लिपी' असं म्हणूया. ह्या बाळबोध लिपी मध्ये 'र', 'ट', ठ', 'छ', 'ळ', 'ढ', 'ड', 'द', 'ह' इत्यादी अक्शरांना (व्यंजन+स्वर) स्वरांची एक दांडी नाही आहे. जशी 'प','न','म','ग', 'त','थ','ध','घ' इत्यादी अक्शरांना (व्यंजन+स्वर) आहे तशी. जर मराठी भाषेसाठी वरील दांडी नसलेल्या अक्शरांना (व्यंजन+स्वर) दांडी लावली तर प्रोग्रॅमर ला फक्त 'डाटा एनकोडींग' तयार करता येण्या बरोबर त्यावर आधारीत दुसऱ्या व तिसऱ्या स्तरावरचे अनुक्रमे 'डिस्क ऑपरेटिंग सिस्टम', व युजर एंड सॉफ्टवेअर तयार करणं सोयीचं जाईल. अशी माझी अटकळ आहे. 'लिपीतील चिन्हांची सांगड कशी घातली आहे' ह्या तत्त्वा मुळेच रोमन व त्यानंतरची ती लिपी वापरणारी पाश्चात्य मंडळी तंत्रावर, यंत्रावर व त्यायोगे समृद्धीवर आपली पकड ठेवू शकले आहेत अशी माझी मनोधारणा आहे.
जर बाळबोध लिपीत सुधारणा केल्या तर भविष्यात मराठी माणसाची मानसिकता बदलली जावून त्यायोगे 'सद्सत-विवेकबुद्धी' ला धरूनच ते आपली प्रगती करू शकतील. रोमन लिपीत स्वर व व्यंजनांची फोड करता येत नाही. बाळबोध लिपीत ती करता येते. 'स्वर' व 'क्शर' ह्यांनी मिळून 'अक्शर' तयार होते, ही भारतीय, हिंदू विचारसरणीच 'अर्धनारीनटेश्वराचे' दर्शन घडवू शकते.
लिपीत सुधारणा नाही केली तर मानसिकतेत सुधारणा होणार नाही. व त्याचा परिणाम जसे पाश्चात्य देशात वाढत जाणारे 'गे', 'लेस्बियन' अशा विचित्र जमातींचं कुटंब पद्धतीवर आधारलेल्या समाजावर प्रभुत्व वाढेल अशी मला भीती वाटते.