सुंदर लेख. आवडला. पण खरेतर शेवईवाद हा आपल्या पूर्वजांनी आधीच मांडला होता त्यामुळे याचे खरे जनक आपणच आहोत. याबद्दलचा सज्जड पुरावा मंडकोपनिषदाच्या नऊशे सत्तावनाव्या श्लोकात सापडतो. दुर्दैवाने पानशेतच्या पुरात याच्या सर्व प्रती वाहून गेल्याने आता पुरावा विचारू नये.
शेवई म्हणजे खरेतर आपल्या समईची वात. शेवई-सेवई-सेमई-समई असा तो कठीण प्रवास आहे. आपले पूर्वज किती महान होते याचा हा आणखी एक पुरावा. तर अशा समईच्या वातींनीच हे विश्व बनले आहे. नंतर पाश्चात्यांनी ही कल्पना ढापून स्ट्रिंग थिअरी मांडली. पण प्राचीन भारतात समईच्या ज्योतीइतकीच स्ट्रींग थिअरीही जुनी आहे.
आपले पूर्वज महान होते. साहजिकच आपणही महान आहोत. यावर अविश्वास दाखवणाऱ्याच्या ल्यापटॉपच्या ऱ्यामची शंभर शकले होऊन त्याला कधीच सिस्टीम बूट करता येणार नाही. ही शापवाणीही प्राचीन ग्रांथांमध्ये आढळते.
हॅम्लेट