इतक्या सुरेख लेखमालेला आलेला प्रतिसाद पाहून काय निष्कर्ष काढावा असा प्रश्न पडला आहे.
श्रावण मोडक ह्यांचे लेखन नेहमीच दर्जेदार असते आणि त्यांनी ते स्वतःच्या अनुभवातून लिहिलेले असते असे आजवरचे माझे पाहणे आहे. त्यावर किरकोळ नजर टाकून माझे कधीच समाधान होत नाही. त्यातून हे संगीतक्षेत्रातल्या अनुभवांवर लिहिलेले लेख आहेत. त्यातला मी एकही अद्याप वाचलेला नाही. मी त्याची वाचनखूण ठेवलेली आहे.
एवढे सगळे नीट मन लावून वाचायला मी वीकेंड ठेवलेला आहे.