मनोगतासाठी ड्रुपलची अद्ययावत प्रकाशित आवृत्ती वापरली जात आहे, आणि सतत अद्ययावत आवृत्तीच वापरण्याचे धोरण ठेवलेले आहे.
ड्रुपल वापरून शक्य असणाऱ्या सर्व सुविधा ड्रुपलच्या गाभ्यात समाविष्ट केलेल्या नसतात. त्यांच्या संस्करणाचे आपापले स्वतंत्र कालबद्ध कार्यक्रम असतात.
ड्रुपलमध्ये शक्य असणारी छपाईयोग्य पानाची सुविधा आजानुकर्ण ह्यांनी वरील सुचवण करण्याच्या एकदोन दिवसच आधी ड्रुपलच्या ताज्या आवृत्तीशी मिळतीजुळती झाली होती. शिवाय मनोगतावरील पानांची (सध्याची आणि भविष्यातील) विविधता (उदा. शब्दकोडे, पाककृती, उघडणारे मिटणारे प्रतिसाद इ. ) विचारात घेऊन ही सुविधा ठिकठिकाणी बदल करून वापरावी लागेल असे लक्षात आले. सध्या इतर सुविधांवर काम चालू असल्याने तिला प्राधान्य दिलेले नव्हते. आता जेव्हा तिच्याकडे लक्ष द्यायचे ठरवले तेव्हा डुपलची पुढची आवृत्ती आली! आता ह्या सर्व सुविधा एकमेकांशी मिळत्याजुळत्या करायला ह्या महिन्याच्या शेवटी शक्य होईल अशी आशा आहे.
(तुम्हाला नेमके कुठले पान छापून हवे आहे ते कळवल्यास त्यासाठी काही विशेष पद्धत प्राधान्याने वापरता येईल का, ते पाहता येईल.)