रोमन किंवा देवनागरी अक्षरे असलेला प्रोग्रॅम कंपाईल करणारी जी आज्ञावली असते तिला त्या संगणक भाषेचे व्याकरण संपूर्णपणे माहीत असते.
त्यामुळे जर काही दुसऱ्या कारणामुळे त्या लिपीची चिन्हे बदलणार असतील तर कंपायलरही परत लिहावा लागेल.
एखाद्या लिपीमध्ये सर्व अक्षरांना दांडी आहे की नाही याचा कंपायलरला काहीही फरक पडत नाहीः
उदा :
असे समजूया की एखाद्या संगणक भाषेतील if आणि then ह्या दोन शब्दांचे कंपायलर ०००००००१ आणि ००००००१० असे रूपांतर करतो.
आता देवनागरी लिपी वापरणारी दुसरी एक संगणक भाषा वरील शब्दांना प्रतिशब्द म्हणून अनुक्रमे "जर" आणि "तर" वापरत असेल तर त्या भाषेच्या कंपायलरने ह्या दोन शब्दांचे कंपायलर ०००००००१ आणि ००००००१० असे रूपांतर केले की झाले.
कंपायलर आज्ञावली लिहिणाऱ्या माणसाला "ज" ला दांडी आहे आणि "र" ला नाही याने काही फरक पडणार नाही -- किंबहुना उद्या "र" हे अक्षर "रा" असे (दांडी असलेले) लिहायचे ठरले तरी कंपायलर लिहिणाऱ्या माणसाचे काम अजिबात सोपे होणार नाही (हे स्वानुभवाने सांगतो).
प्रतिसादातील शेवटच्या बऱ्याचशा भागाचा मूळ विषयाशी संबंध अजिबात समजला नाही - असो.