अनूभूतींच्या प्रवासाचे सुरेख वर्णन. चारही भाग एकदम वाचले. परत वाचेनच. इतक्या जागी ओळखीच्या भावना, आठवणी आल्या की त्या शद्बात मांडणे अवघड आहे. अशा प्रकारच्या अनूभूतिंमध्ये मेंदूचा वाटा ही रोचक गोष्ट आहे.
असे तर म्हणतोच. 'कॉल ऑफ दी व्हॅली ' ने झपाटलेले दिवस आठवले. 'ईस्ट मीटस वेस्ट' चेही. उरलेले शास्त्रीय गायकी / वादकीचे श्रवण करण्यासाठी निवृत्तीनंतरचा काळ राखून ठेवला आहे - तोवर जगलो तर!
प्रतिसादांची संख्या पाहून फारसे नवल वाटले नाही. एकतर लिखाण एका विवक्षित आवडीच्या विषयावरचे आहे, आणि तेही दीर्घ आहे. बहुतेकांनी ' हे मोठे आहे, जमल्यास वीकेंडला वाचू' म्हणून बाजूला ठेवले असावे (ही आशा!)