लोखंडाच्या जाड बुडाच्या कढईत दुध आटवतो. विस्तव मध्यम ठेऊन कालथ्याने दुध हलवत राहतो.
आटवताना शेजारी वाटीत चमचाभर पाणी ठेवतो कारण जर दुध भस्सकन वर आले तर विस्तव बारीक
करताना गोंधळ उडू शकतो त्याऐवजी वर येणाऱ्या दुधात थेंबभर गार पाणी पडले तरी ते खाली बसते.
पुरेसे दुध आटले की विस्तव बंद करून त्या दुधात साखर घालतो व नीट ढवळतो. मग ते आटलेले दुध
एकीकडे गार करायला ठेऊन दुसरीकडे खलटूमध्ये अर्धा चमचाभर पाण्यात केशर घेऊन ते नीट खलतो. मग ते घट्ट द्रव केशर गार बासुंदीत नीट मिसळतो आणि मग बासुंदीची वाटी वाढताना त्यावर बदामाचे
जाडे काप, वेलचीची पूड, पिस्ता, डाळींबाचे लालचुटूक दाणे पेरतो.