आम्ही देशस्थ मंडळी त्याला गडगणेर असे म्हणतो.
लग्नामुंजिच्या आमंत्रणा दाखल आपण काही भोजन समारंभ करतो त्याला गडगणेर म्हणतो.
उत्तर भारतामध्ये लग्नानंतर वर वधुस जेवणास बोलावितात पण आपण मात्र लग्ना आधिच बोलावितो.
पुर्वी असे सर्व विधी आरामात चालत असे. आजकाल मात्र बरिच काटछाट झाली आहे पण तरिही अजून केळवण / गडगणेर आवर्जून केला
जातोच जातो.