तीन लाख नव्हे, ५ लाख अनुयायी सोबत धम्म दीक्षा घेतली आणि मग सर्व अनुयायांना धम्म दीक्षा दिली.
बाबासाहेब यांनी २१ वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि त्यांच्या असे लक्षात आले की बुद्ध धम्म, एकमेव असा धम्म होय जो सर्व मनुष्य आणि प्राणीमात्र यांना समानतेने वागनुकीची शिकवण देतो आणि म्हणून त्यानी १९३५ साली धर्मंताराची घोषणा केली आणि १९५६ साली पवित्र दीक्षाभूमी वर रक्तहीन अशी ऐतिहासिक क्रांती भगवान बुद्ध यांच्या पवित्र भूमी वर केली. बाबासाहेब म्हणाले की हिंदू धर्मात मी जन्म घेतला ते माझ्या हातात नव्हते, माणसाला जनावरपेक्षा ही खालची वागणूक देणारा हिंदू धर्म त्यागून समानतेने शिकवण देणारा असा बुद्ध धम्म स्विकारतो आणि हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही.