माणसाला जनावरपेक्षा ही खालची वागणूक देणारा हिंदू धर्म

गेल्या १ हजार वर्षात असे घडले असावे मात्र मूळ हिंदुधर्म जन्माधारित जातीयवादाचा पुरस्कार 
करणारा नाही.  कारण गीतेच्या चौथ्या अध्यायात १३ व्या श्लोकात श्रीकृष्ण स्वत: म्हणतो की ह्या 
चातुर्वणाची निर्मिती मी स्वत: माणसाचा स्वभावधर्म व कर्मानुसार
 केली आहे.  

माझ्या दोन नवबौद्ध घनिष्ठ मैत्रिणी होत्या जाधव व ठोकळे आडनावाच्या.  त्या एकमेकींशी बोलत नसत.  
मला आश्चर्य वाटे.  मी विचारल्यावर एकदा जाधव मला म्हणाली की आम्ही चांभार बौद्ध व ठोकळे महार 
बौद्ध म्हणून मी तिच्याशी बोलत नाही. आमच्यात रोटी बेटी व्यवहारपण होत नाहीत. असे अनुयायी 
असताना जसा बौद्ध धर्म अयोग्य ठरत नाही तसा चुकीचे अनुयायी असले तरी मूळ हिंदुधर्म चुकीचा ठरत 
नाही.
  

मला वाटते दुसऱ्याला कमी लेखणे हा त्या त्या धर्माचा दोष नसून ती मनुष्य प्रवृत्ती आहे.  आजही 
वसई भागात गेलात तर दिसेल की सामवेदी ख्रिश्चन स्वत:ला वाडवळ ख्रिश्चनांपेक्षा उच्च दर्जाचे समजतात.  
काही ख्रिश्चन जमातींनी तर उघडपणे सांगितले आहे की धर्म बदलला तरी आम्हाला तिच वागणूक मिळत आहे 
म्हणून आम्हाला आरक्षण सुविधा द्यावी.  

फक्त हिंदुधर्माचे वैशिष्ट म्हणजे दुसऱ्याची न पटलेली मते तलवारीच्या जोरावर मोडून न काढता 
वादविवादाद्वारे सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.  दुसऱ्याचे मत योग्य असेल तर नि:संशय मानले जाते.  
उदा.  शंकराचार्यांनी चांडाळाला गुरू मानले. पूर्वीच्या काळी वादविवादासाठी विद्वत् सभा भरत असत. 
हिंदुधर्मात तुम्हाला जनसंहार (मसाक्रे),  सक्तीने धर्मांतर मोहिम, धर्मयुद्ध (क्रुसेड) असे शब्द ऐकू येणार नाहीत.  

आजही हा धर्म सुधारणांप्रती अतिशय लवचिक आहे व त्यातील त्रुटिंवर टीका करणाऱ्यांविरुद्ध फतवे निघत 
नाहीत हे ह्या धर्माचे विशेषत्व आहे.