तर आत्तापर्यंत झालेल्या चर्चेचा सारांश काय?

श्रीनि ह्यांनी ३० सप्टेंबरला १२:१६ वा. लिहिले:

त्यामुळे मला वाटते कि एखादी म्हण जर खरोखरच बोलीभाषेत असेल तर ती तशीच लिहायला हरकत नाही; पण सर्वसाधारण लिखाण करताना अर्थातच शुद्धलेखनाचे नियम पाळावेत.

हे जर सर्वांना मान्य असेल, तर हया चर्चेवर ह्या ठिकाणी पडदा टाकायला हरकत नाही.

श्रीनिंने उपस्थित केलेल्या 'तर्कशुद्ध शब्दप्रयोग' ह्या मुद्द्यावर महेशने नवी चर्चा सुरू केली आहे तिथे हा धागा पुन्हा पकडता येईल.

तसेच ह्या चर्चेतले इतर काही धागे अथवा तंतु अनिर्णित असले तर त्यावर नवी चर्चा सुरू करावी असं मी सुचवतो.

ता.क. पण एखादं सूत जर सापडलं तर ते धरून घाईने स्वर्ग गाठू नये ही विनंती.