एकदा आम्ही भारतातील जर्मन राजदुताच्या घरी गेलो होतो.  त्याच्या बायकोने आमच्या पुढे 
सर्व अल्कोहोल भांडार खुले केले.  खरे तर सर्वांनाच बियर पिऊन बघायची इच्छा होती कारण 
जर्मन भाषा शिकताना वारंवार बियर चा उल्लेख येतो.  पण कोणीच पुढाकार घेईना.  

शेवटी एका चषकात ऍप्पी घेऊन त्यात सोडा घालून आम्ही तो दिवस साजरा केला. दुधाची 
तहान ताकावर...