आज्ञावल्या देवनागरीत(म्हणजे मराठी, हिंदी, नेपाळी, कोकणी, संस्कृत वगैरे भाषांत) लिहिण्याने कुणाचा फायदा होणार आहे? संगणकीय भाषा सोपी होणार की अवघड? ज्याला रोमन लिपी आणि घड्याळ्यातले हिंदू अंक वाचता येत नाही त्याला थोडाफार लाभ होईल.  पण संगणक वापरणारी अशी किती अडाणी माणसे भारतात असतील?

केंद्र सरकारचे शासकीय कामाची भाषा हिंदी  करण्याचे प्रयत्‍न अयशस्वी झाले कारण कामकाज अवघड व सावकाश झाले आणि परत अहिंदी प्रांतांसाठी इंग्रजी भाषांतर करून देण्याचे काम वाढले. येथेही असेच होईल.