टाळ्या नाहीत; तरीही संगीताची मैफील? पुन्हा एक प्रश्न. प्रत्यक्ष मैफिलीत गेल्यावर त्याचा सच्चेपणा पटला. सुरांच्या सच्च्या भक्तांसाठी टाळ्यांची गरज नसते. मान डोलावण्यातूनही काय घडतं त्याचा अनुभव त्या तीन रात्री तिथं घेतला.

हा अनुभव विलक्षण आहे. हल्ली कलाकृतीची थोरवी आणि कलावंताचे मोठेपण त्याला मिळालेल्या प्रतिसादावर मोजण्याकडे कल व्हायला लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आपला अनुभव हा केवळ डोळे उघडणारा आहे.

(हो, ताजमहाल कुठे म्हणतो, मला सुंदर म्हणा म्हणून!)

पण मध्येच कुठं तरी आतमध्ये काही तरी व्हायचं. अंगावर रोमांच यायचे एखाद्या तानेनंतर.

आपल्याला ज्ञान आहे ह्याचे ज्ञान ह्वायला लागते तेव्हा बहुदा असे होत असावे.

सुंदर.

आपले लेखन मी नेहमीच वाचतो. हेही त्याच हारातले एक तोलामोलाचे पुष्प आहे.

-श्री. सर. (दोन्ही)