कर्म माझ्या वाटचे, झाले न माझ्या हातुनी
रंगुनी स्वप्नात पुढच्या, आज गमवून बैसलो
मार्ग माझा उजळण्याची वाट पाहत राहिलो
भाग्य की, झालो शहाणा ठेच एकच लागुनी ॥२॥
अनुभवाचे अगदी योग्य वर्णन आहे हे. (पुढच्यास ठेच मागचा शहाणा सारखे मला ठेच मी शहाणा असे सुचवता की काय? कृपया ह. घ्यावे.)
अगदी सुंदर कविता.
(आपले नाव असे विचित्र का ते कळेल का? )