केळी हे विपुल संततीचे, सौभाग्याचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. केळीच्या फुलापासून फळ तयार होताना त्याचा चरचर असा आवाज येतो. केळीप्रमाणेच घरात आलेली/येणारी नवी स्त्री ही सौभाग्यवान, विपुल संतती होईल अशी असावी अशी भावना या समारंभात आहे. म्हणून या समारंभाला केळवण असे म्हणतात. ही माहिती 'भाषा आणि जीवन' मासिकाच्या पानपूरकांमध्ये वाचल्याचे आठवते. अर्थात जितके/जसे आठवेल तसे लिहिले आहे. चू. भू. दे̱. घे.