ओबामानी २९ ऑगस्टला डेनवर येथे मार्टीन ल्युथर कींग ज्यु. यांच्या स्मृतीदिना निमित्त भाषण केले होते. 'चेंज - वी नीड' असा त्यांचा नारा आहे. त्यावेळेस त्यांनी अमेरिकन जनतेला  केलेले, खरे तर त्यांच्या कडून घेतलेले प्रॉमिस म्हणजेच 'अमेरिकन प्रॉमिस'. ते प्रॉमिस म्हणजे फार वेगळे आश्वासन नव्हे तर आपल्या कडे विरोधी पक्षाच्या नेते सर्रास करतात तसे आश्वासन आहे. अत्याचारी सत्ता उलथऊन लाऊ, सर्वांशी बंधुभावाने वागु वगैरे.....! (आठवा सेनाप्रमुखांनी केलेले या वेळेचे दसऱ्याचे भाषण).