'अमन्त्रम् अक्षरम्' म्हणा किंवा 'अक्षरम् अमन्त्रम्' म्हणा, मला तरी काहीही फरक वाटत नाही.
मात्रांच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास हे वृत्त 'अनुष्टुभ्/प् छंद' आहे असे दिसते.
माझ्या आठवणीप्रमाणे: -
अनुष्टुभ् छंद तो ज्याला
एक नेम नसे गणी
अक्षरे चरणी आठ
देवा तार मला त्वरे
आता राहिला प्रश्न चिन्हात बदल झाल्यास फरक पडतो की नाही त्याचा.
'वक्रतुण्ड महाकाय...' मध्ये 'सूर्यकोटि' आणि 'कोटिसूर्य' असे दोन शब्द वाचल्याचे स्मरते. अनेक ठिकाणी पाठभेद असतात आणि ह्या ठिकाणी अशा पाठभेदामुळे अर्थामध्ये काही फरक पडतो असे मला तरी वाटत नाही.