"थोडी वैचारिक बैठक असणाराच शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकतो." असे म्हटले तर. जो शास्त्रीय संगीताच आस्वाद घेऊ शकतो त्याला वैचारिक बैठक असते असे म्हणायचे का?
काय पण मार्मिक (ऱ्हस्व की दीर्घ? ) प्रश्न आहे. त्या संवादातून मला जे (आ)कळले त्यानुसार -
१. शास्त्रीय संगीत समजणे आणि त्याचा आस्वाद घेता येणे हे वेगळे असावे.
२. शास्त्रीय संगीत समजण्यासाठी वैचारिक बैठक असणे आवश्यकच आहे असे नसावे.
३. नुसते समजते त्या/तिलाही वैचारीक बैठक असू शकते. तो/ती आस्वाद घेऊ शकेलच, असे नसावे.
४. न समजूनही आस्वाद घेता येत असावा. त्या/तिला वैचारिक बैठक असावी. त्या बैठकीचे प्रयोजनच मुळी न कळलेल्या काही बाबींचा आस्वाद घेता यावा हे असावे. तशी नसताना होणाऱ्या श्रवणाला आस्वाद म्हणता येणे शक्य नाही कारण आस्वाद आणि आकलन या मूलतःच भिंन्न बाबी आहेत.
५. आता, आस्वाद घेणे आणि आपल्याला उमगलेले संगीताचे मर्म सांगणे या दोन्ही बाबीत फरक असावा. 
६. तेंव्हा आता, जो आस्वाद घेऊ शकतो त्या(/ति)ला वैचारीक बैठक आहे, हे गृहित धरणे सोपे जावे. कारण आस्वादासाठी शास्त्रीय संगीत समजणे आवश्यक आहे, असे नाही.
हुश्श. शास्त्रीय संगीत मला आकळलेले नाही याचा हा ठोक पुरावा. कारण एकही विधान ठोस नाही. पण एक ठोस विधान होऊन गेले बहुदा.
असो. मूळ विधान बुवांचे. त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील संचार पाहून त्याचा नेमका अर्थ ठरवावा लागेल हा महत्त्वाचा डिस्क्लेमर.