तुम्ही चर्चेसाठी ठेवलेला विचार खरंतर अगदी साधाच आहे. पण कधी कधी असा एखादा साधाच विचार चर्चेचा चांगला विषयही होऊ शकेल असं डोक्यातही येत नाही. तुमचा वरचा विषयही असाच आहे. म्हणूनच आवडला.
आणखी एक:
त्यातली महत्वाची खुबी म्हणजे रस्ते लक्षात ठेवणे. मी जवळ जवळ सर्व मुंबई (उपनगरे नव्हेत) पायी हिंडलेले आहे.
तुमचे अक्षरशः पायच पकडले पाहिजेत! माझं अगदी हेच न्यून आहे. रस्ते माझ्याही चांगले लक्षात राहतात, पण जास्ती करून गाडी चालवण्यासाठीच! चालण्याचा मात्र मला अगदी मनस्वी कंटाळा! तसं सकाळी व्यायाम करताना मी पाच पाच किलोमीटर जॉगिंग करतो, पण घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर वाण्याकडे जायला मात्र गाडी लागते! (आता अशा कामांसाठी एक सायकल घ्यायचा विचार करतोय!)